महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य अविस्मरणीय -डॉ.प्रा. श्रीकांत गायकवाड
महात्मा ज्योतिबा
फुले यांचे कार्य अविस्मरणीय
-डॉ.प्रा. श्रीकांत गायकवाड
*लातूर दि. 11 ( जिमाका)* महात्मा
फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा, पहिली अस्पृश्यांसाठीची शाळा, पहिली प्रौढ
व रात्र शाळा, पहिला पुर्नविवाह, अनाथ बालिकाश्रम, बालहत्या प्रतिबंध गृह, अनाथ मुलांचे
संगोपन, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यासाठी प्रयत्न केले. सत्यशोशक समाजाची स्थापना
करुन सर्वांना समता, स्वातंत्र व विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारीत जीवनमार्ग म्हणजे लोकशाही असे त्यांचे कार्य अविस्मरणीय
असल्याचे प्रतिपादन डॉ. प्रा. श्रीकांत गायकवाड यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम दि. 6 एप्रिल 2022 ते
16 एप्रिल 2022 या कालावधीत साजरा करणेबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार समाज कल्याण
विभाग, जि.प. लातूर मार्फत दि. 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता यशवंतराव चव्हाण
सभागृहात थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
या जयंती निमित्त महात्मा बसवेश्वर
महाविद्यालय, लातूर येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रा. श्रीकांत गायकवाड यांच्या
व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्याख्यानामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी
तत्कालीन अनिष्ठ सामाजिक, धार्मिक, रुढी, प्रथा व परंपरा यांच्या विराधात जावून समाज
सुधारण्याचा अविरत प्रयत्न केल्याचे त्यांनी नमुद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
प्रादेशिक उपायुक्त, अविनाश देवसटवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सुनील खमीतकर, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, कक्ष अधिकारी श्री. मसलगे,श्री. माने व जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित
होते. या कार्यक्रमाचे संचानल दिव्यांग विभाग प्रमुख राजू गायकवाड यांनी केले तसेच
आभार प्रदर्शन कार्यालयीन अधिक्षक राम वंगाटे यांनी केले.
0000
Comments
Post a Comment