माताजी नगर येथे मार्जिन मनी योजनेबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न

 

*माताजी नगर येथे मार्जिन मनी*

*योजनेबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न*

 

*लातूर दि. 12 ( जिमाका ):-*  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूरच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त दिनांक 6 एप्रिल, 2022 ते दिनांक 16 एप्रिल, 2022 सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने दिनांक 12 एप्रिल, 2022 रोजी महामाया बौध्द विहार माताजी नगर, लातूर येथे मार्जिन मनी योजनेबाबत मार्गदर्शन शिबीर संपनन झाले असल्याचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त , लातूर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

या शिबीरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाज कल्याण निरीक्षक भगवान केंद्रे उपस्थित होते. या कार्यक्रमास तालुका समन्वयक नागेश जाधव, युवराज कावाले, समतादुतचे प्रकल्प अधिकारी धनासुरे राजकुमार, समतादुत बलभीम सुरवसे, गोविंद झाडके, यास्मिन शेख, मौसीन पठाण आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महामाया बौध्द विहार जयंती उत्सव समितीचे अशोक कांबळे, आकाश कांबळे व रोहित कांबळे तसेच लोक परिवर्तन फाऊंडेशनचे फजल खान, बाबासाहेब जावेद आदींनी परिश्रम घेतले.  

****    

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा