उदगीर येथे विद्यावर्धिनीची मतदान जागृती प्रभातफेरी संपन्न राज्यमंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती

 

                उदगीर येथे विद्यावर्धिनीची मतदान जागृती प्रभातफेरी संपन्न

राज्यमंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती

 लातूर, (जिमाका) दि. 20 : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्या वर्धिनी  च्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्या सूचनुसार व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उदगीर यांच्या पत्रानुसार मतदान जनजागृती विविध उपक्रम शाळा स्तरावर राबविण्यात यावे असे आदेश दिल्यामुळे काल दिनांक 20 एप्रिल, 2022  रोजी मतदान जागृती प्रभातफेरी आयोजित करून उदगीर शहरातून भव्य दिव्य अशी 600 विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.

या रॅलीचे उद्घाटन उदगीरचे नायब तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गुट्टे ,उदगीर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मतदान जनजागृती रॅलीस उपस्थिती दर्शविली.

यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अजित पाटील तोंडचिरकर, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अविनाश पोशेट्टी, उपमुख्याध्यापक बाबुराव नागरवाड, प्राचार्य व्ही .एस कणसे, एम. एस जाधव, कला शिक्षक एन .आर जवळे, क्रीडाशिक्षक आर. एस नगरे, बंडू पाटील लोणीकर यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने मतदान जनजागृती प्रभात फेरी मध्ये उपस्थिती होती.

**** 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु