थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा केल्यास लाभार्थ्यांना थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत
थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी
भरणा केल्यास लाभार्थ्यांना
थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत
*लातूर दि. 13 (जिमाका):-* महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या
संचालक मंडळाने महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असणाऱ्या लाभार्थीसाठी संपूर्ण थकीत
कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थींना थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत
देण्यास मान्यता दिली असल्याचे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर
मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जि. लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
सदर एकरक्कमी परतावा योजना दि. 31 मार्च 2023 पर्यंत
राबवीण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील महामंडळाच्या थकीत कर्ज असलेल्या सर्व
लाभार्थींनी 50 टक्के व्याज सवलतीच्या एकरक्कमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा व
कर्जमुक्त व्हावे असे आवाहन महामंडळाने केले आहे.
000
Comments
Post a Comment