महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात दोन शिकाऊ उमेदवारांसाठी भरती
महाराष्ट्र
राज्य मार्ग परिवहन महामंडळात
दोन
शिकाऊ उमेदवारांसाठी भरती
लातूर
दि. 11 (जिमाका ) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, लातूर विभाग, लातूर
मध्ये सन 2022-23 सत्रासाठी वेगवेगळ्या व्यवसायाकरीता शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी)
म्हणून 02 पदे ऑनलाईन पध्दतीने पद / जागा निश्चित करण्यात आले असून या जागा अभियांत्रिकी
पदवीधर / पदवीका (Mechanical)-02, अशी भरावयाची आहेत असे विभाग निबंधक रा.प. लातूर
यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
अभियांत्रिकी पदवीधर / पदवीकाधारक उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनी NATS पोर्टलवरील
www.mhrdnats.gov.in या राष्ट्रीय वेबसाईटवर दिलेल्या सुचनांप्रमाणे ऑनलाईन
रेजिस्ट्रेशन (Online Registration) करून MSTRC Latur Division या आस्थापने (Establishment) WMHLA000003 करीता ऑनलाईन
अर्ज करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदरचे ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केलेल्या शिकाऊ उमेदवारीकरीता
इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज भरण्याची तारीख
दि. 09 एप्रिल 2022 ते 24 एप्रिल 2022 वेळ 13.00 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
सदरचे छापील अर्ज रा. प. विभागीय कार्यालय, जुना
रेणापुर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर (आस्थापना शाखा) येथे दि. 09 एप्रिल 2022 ते 24 एप्रिल 2022 वेळ
13.00 वाजेपर्यंत रोजी वेळ 13.00 वाजेपर्यंत
सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील. सदरहू अर्जाची
किंमत (GST 18% सहित) खुल्या प्रवर्गाकरीता रूपये 590/- व मागासवर्गीयांसाठी रूपये
295/- आहे. त्याप्रमाणे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी MSTRC Found Account Latur या नावाने रू. 590/- चा व मागासवर्गीय उमेदवारांनी
रू. 295/- चा धनाकर्ष किंवा आय.पी.ओ. (इंडियन पोस्टल ऑर्डर) अर्ज घेतेवेळी सोबत आणणे
आवश्यक आहे.
दि. 09 एप्रिल 2022 पुर्वी व दि. 24 एप्रिल 2022
रोजी वेळ 15.00 नंतर ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात
येणार नाही व ते रद्द समजले जातील व त्यांना या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज
देण्यात येणार नाही. जे उमेदवार दि.24 एप्रिल 2022 रोजी वेळ 13.00 वाजेपर्यंत या कार्यालयाचे
विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणार नाहीत त्यांचा शिकाऊ उमेदवार भरतीसाठी विचार केला
जाणार नाही. अभियांत्रिकी पदवीधारक (Mechanical Engineering ) उमेदवारांना प्रथम प्राधान्य
देण्यात येईल याची नोंद घ्यावी असे ही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.
000
Comments
Post a Comment