भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले अभिवादन ..!
लातूर,दि.14,(जिमाका):- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करुन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार विक्रम काळे त्यांच्या समवेत होते
. तसेच आमदार संभाजी पाटील निलंगेकर, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., महानगर पालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांनीही अभिवादन केले.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131
व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
****
Comments
Post a Comment