देवणी येथे 14 एप्रिल रोजी पशु प्रदर्शनाचे आयोजन जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनात सहभाग नोंदवावा --- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे आवाहन

 

  देवणी येथे 14 एप्रिल रोजी पशु प्रदर्शनाचे आयोजन  

 

   जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनात सहभाग नोंदवावा

---जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे आवाहन

 

लातूर दि. 12 ( जिमाका ):- प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री. महादेव यात्रा 2022 निमित्त गुरुवार, माण्‍य गट ट त्त संवर्धदि. 14 एप्रिल, 2022 रोजी देवणी येथे भव्य जिल्हा स्तरीय पशुप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, लातूर यांनी कळविले आहे.

या पशुप्रदर्शनात सहभागी होणारे पशुधनाचे गट व नियम अटी पुढील प्रमाणे राहतील.

देवणी नर गट :- 1) देवणी नर 1 वर्षाखालील वासरे गट, 2) देवणी नर 1 वर्षावरील वासरे गट,                         3) देवणी नर 2 दात वळु गट, 4) देवणी नर 4 दात वळु गट, 5) देवणी नर 6 दात वळु गट .

देवणी मादी गट :- 1) देवणी मादी 1 वर्षाखालील वासरे गट, 2) देवणी कालवड गट, 3) देवणी गाभण गाय गट, 4) देवणी गाय / दुधाळ गट .

लालकंधारी नर गट :- 1) लालकंधारी नर 1 वर्षाखालील वासरे गट, 2) लालकंधारी नर 1 वर्षावरील वासरे गट, 3) लालकंधारी नर 2 दात वळु गट, 4) लालकंधारी नर 4 दात वळु गट, 5) लालकंधारी नर 6 दात वळु गट .

लालकंधारी मादी गट :- 1) लालकंधारी मादी 1 वर्षाखालील वासरे गट, 2) लालकंधारी कालवड गट, 3) लालकंधारी गाभण गाय गट, 4) लालकंधारी गाय / दुधाळ गट

संकरित मादी गट :- 1) संकरित मादी 1 वर्षाखालील वासरे गट, 2) संकरित कालवड गट, 3) संकरित गाभण गाय गट, 4) संकरित गाय / दुधाळ गट .

अश्व गट :- 1) अश्व नर गट , 2) अश्व मादी गट .

कुक्कुट गट :- 1) देशी कोंबडी गट, 2) विदेशी कोंबडी गट

उस्मानाबादी शेळी गट :- 1) तिन पिल्ले व त्यावरील पिलांची उस्मानाबादी शेळी गट

पशुप्रदर्शनासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे राहतील :- पशुधन व कुक्कुट गटांची नोंदणी ही प्रदर्शनादीवशी सकाळी 11-00 वाजेपर्यंतच मर्यादित राहील; कुठल्याही परिस्थितीत सकाळी 11:00 वाजल्यानंतर नाव नोंदणी केली जाणार नाही याची सर्व पशुपालकांनी नोंद घ्यावी. सकाळी 11-00 ते दुपारी  3-00 ही वेळ पशुधन निवडीसाठी राखीव राहील.  प्रत्येक गटातील पशुधनास प्रथम, द्वितीय, तृतीय व अ, ब, क, ड अशाप्रकारे बक्षीस वाटप करण्यात येईल. प्रत्येक गटात दहा पशुधनाचा सहभाग बंधनकारक राहील अन्यथा तो गट होणार नाही व त्या गटातील पशुधनास ग्रेडप्रमाणे अ, ब, क, ड याप्रमाणे बक्षीस वाटप करण्यात येईल.

सर्व सहभागी पशुपालकांना बक्षीसाची रक्कम ही संगणक प्रणाली आर.टी.जी.एस. द्वारे अदा करण्यात येईल. त्यासाठी नोंदणी करतांना पशुपालकांचे आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स, पशुधंनाचा दाखला देणे बंधनकारक राहील. कुठल्याही परिस्थितीत बक्षिसाची रक्कम ही रोख स्वरुपात दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. पशुपालकांनी आपली बहुमोल पशुधन व्यवस्थित दोरखंडाने बांधुन आपल्या जबाबदारीने आणावे/ ठेवावे. निवड प्रक्रिया ही पारदर्शक असून निवड समितीचा निर्णय हा अंतिम राहील. निवड समिती अधिकारी/ कर्मचारी यांच्याशी हुज्जत/वाद घालणे यासारखा अनुचित प्रकार आढळल्यास संबंधित पशुपालकांची नोंदणी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.  कुठल्याही परिस्थितीत सर्वोत्तम पशुधन (चॅम्पियन) ची निवड केली जाणार नाही. सर्व पशुधनास ईनाफ प्रणालीतील टॅग असणे आवश्यक असल्याचेही पत्रकात नमूद केले आहे.  

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा