एक दिवशीय तृतीय पंथी मतदार नाव नोंदणीच्या
विशेष शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद.
*लातूर
दि.1(जिमाका)* 31 मार्च 2022 हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख
दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाच्या निमिताने दिनांक 27 मार्च 2022 से
दि.02 एप्रिल 2022 हा तृतीय पंथीय मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह म्हणून साजरा करण्याचे
निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांनी दिलेले असुन या सप्ताहामध्ये एका दिवशी तृतीय पंथी यांचे
मतदार नाव नोंदणीसाठी विशेष शिबीर आयोजन करण्याचे कळविले आहे. त्यानुसार दि. 01
एप्रिल 2022 रोजी तहसिल कार्यालय, लातूर येथे तृतीय पंथी
यांचेसाठी एक दिवशीय मतदार नाव नोंदणीच्या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले
होते. सदर विशेष मोहिम अंतर्गत तृतीय पंथी मोठया प्रमाणात उत्सफुर्त प्रतिसाद
मिळाला असल्याचे तहसिलदार लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
या विशेष मोहिमेत मतदार यादीत नाव नोंदणी एकुण 5 तृतीय पंथीयांची व पुर्वी
नोंदणी केलेल्या नाव नोंदणीत दुरुस्ती एकुण 4 असे 9 तृतीय पंथीयांची नोंदणी करण्यात
आली. या विशेष मोहिमेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद
लोखंडे हे उपस्थित होते. व प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता
शिंदे हया उपस्थित होत्या.
तसेच प्रमुख उपस्थिती म्हणुन उपविभागीय अधिकारी, तथा मतदार नोंदणी अधिकारी, 235 सुनिल यादव,
लातूर शहर व तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी स्वप्नील पवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नायब तहसिलदार
निवडणूक तहसिल कार्यालय सुत्रसंचलन कुलदीप देशमुख यांनी केले होते. या प्रसंगी समाजकल्याण
विभागाचे अधिकारी व कर्मचारी सुध्दा उपस्थित होते.
लातूर तालुक्यातील सर्व तृतीय पंथी यांना आवाहन करण्यात येते की, ज्यांचे नाव मतदार यादीत नाहीत व ज्यांचे वय दि. 01 जानेवारी, 2022 रोजी 18 किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यांनी मतदार यादीतील
ऑनलाईन स्वरुपात www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline App च्या
माध्यमातुन अर्ज सादर करावे. तसेच अपवादात्मक परिस्थीतीत वरील सर्व अर्ज हस्तलिखित
स्वरुपात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेमार्फत
सुध्दा स्विकारले जाणार आहेत. त्यानुसार योग्य तो अर्ज भरुन मतदार यादीत नाव
नोंदणी करुन घ्यावी. असे अवाहन उपविभागीय अधिकारी, तथा
मतदार नोंदणी अधिकारी, सुनील यादव व तहसिलदार तथा सहा.
मतदार नोंदणी अधिकारी स्वप्नील पवार यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी - www.nvsp.in
/ https://ceo.maharashtra.gov.in / Voter
Helpline App या संकेतस्थळावर भेट द्या.असे ही पत्रकात नमुद
केले आहे.
000
Comments
Post a Comment