भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमातंर्गत 9 एप्रिल रोजी जेष्ठ नागरिकांसाठी मेळाव्याचे आयोजन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक समता कार्यक्रमातंर्गत
9 एप्रिल रोजी जेष्ठ नागरिकांसाठी
मेळाव्याचे आयोजन
लातूर,दि.7(जिमाका):- भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील 60 वर्षे वयावरील
जेष्ठ नागरिकांचे जनजागृजी शिबीर व जेष्ठ नागरिकांचा मेळावा दिनांक 9 एप्रिल, 2022
रोजी सामाजिक न्याय भवन, लातूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील
जास्तीत जास्त नागरिकांनी सदरील जनजागृजी शिबीरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर
समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र व
बंधुत्व या त्रिसुत्रीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न
दुरदर्शीपणाने व गांभिर्याने नमुद केलेली आहे. कलम 46 मध्ये राज्य हे दुर्बल
जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक
शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण
यापासून त्यांचे संरक्षण करेल, असे नमुद करण्यात आले आहे. वरील निर्देशाचे
अनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय म्हणून
विविध कल्याणकारी योजनाची राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती
सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत. याकरिता
राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम साजरा करण्यासाठी
शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
अधिक माहितीसाठी या
कार्यालयातील समाज कल्याण निरिक्षक संदेश घुगे भ्रमणध्वनी क्रमांक 9405446216 ,
कनिष्ठ लिपीक शिवाजी पांढरे भ्रमणध्वनी क्रमांक 9823768188 तसेच या कार्यालयातील
तालुका समन्वयक नागेश जाधव भ्रमणध्वनी क्रमांक 9503388667 यांच्याशी संपर्क साधावा
असे समाज कल्याणचे सहाय्यक लेखाधिकारी डि. के. राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे
कळविले आहे.
****
Comments
Post a Comment