जिल्ह्यात खत विक्रित्याकडून अनियमितता झाल्यास कारवाई जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

जिल्ह्यात खत विक्रित्याकडून

       अनियमितता झाल्यास कारवाई

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

     लातूर,दि.26(जिमाका):- जिल्ह्यात कुठेही जादा दराने खते विक्री होणार नाही याची दक्षता घेवून  ई पॉस मशिनव्दारेच खते  विक्री झाली पाहीजे. चोवीस तासाच्या आत ग्राहाकास पोहोच देणे खत कंपनी तसेच विक्रेत्यांनाही बंधनकारक असून यामध्ये  अनियमितता झाल्यास कारवाई करण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्ताय गावसाने उपस्थित होते. आगामी खरीप हंगामासाठी बियाणे, खते मागणी, प्राप्त आवंटन, रब्बी अखेर शिल्लक खत साठा, सध्याची उपलब्धता आदी मुद्दयावर यावेळी चर्चा झाली. खतांचा संरक्षित साठा, रेकचे नियोजन, उपलब्ध माथाडी कामगार, खत वाहतुकदार आदींबाबतही त्यांनी कृषि विभागाकडून माहिती घेतली. काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके तसेच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून चालू वर्षाचे नमूने लक्षांक व सर्वच कृषि सेवा केंद्राची तपासणी करणे, निविष्ठा तक्रारीचे बाबतीत गुन्हे दाखल करणे याबाबतही  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी आढावा घेवून सुचना दिल्या.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गायसाने व कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम अधिकारी गोपाळ शेरखाने यांनी कृषि विभागाचा आढावा व खरीपचे नियोजनाचे सादरीकरण केले. उपविभागीय कृषि अधिकारी उदगीर व लातुर, जिल्हा कृषि अधिकारी (सा.) भुजंग पवार व कृषि अधिकारी यांच्यासह खते व बियाणे कंपनीचे प्रतिनिधी, सहाय्यक आयुक्त कामगार, महाबीज, एम,ए.आय.डी.सी. ङिएम.ओ. लातूर जिल्हा डीलर असोशियसनचे प्रतिनिधी प्रमुख घाऊक खत विक्रेते उपस्थित होते.

खरीपासाठी जिल्ह्याला नऊ हजार मे. टन खताची मंजूरी मिळाल्याची माहिती कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी दिली. कृषि विभागामार्फत 1 लाख 54 हजार 300 मे. टन मागणी होती. 1 लाख 9 हजार 921 मे. टनाची मंजुरी मिळाली. युरीया 21261 मे. टन, डीएपी 28800 मे. टन, मएओपी 4631 मे. टन, एनपीके 40919 मे. टन व एसएसपी 14310 मे. टन याप्रमाणे खताची मंजूरी मिळाली आहे.

येत्या खरीप हंगामात ऊस व फळपिकासाठी नॅनो युरीयाचा वापर करणे, जमीन आरोग्य पत्रिका आधारीत संतुलित खत वापर करण्या बाबत शेतकऱ्यांना मोहिम स्वरुपात मार्गदर्शन करणे, ऑरगॅनिक व सरळ खतांचा वापर वाढवणे यावर कृषि विभागाचा भर असणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.

                                                     000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा