जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती उत्साहात साजरी
लातूर,दि.14,(जिमाका):- आज जिल्हा परिषदच्या यशवंतराव
चव्हाण सभागृह जिल्हा परीषद, लातूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131
जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीनिमित्त अधिकारी व कर्मचारी यांनी महामानवास मानवंदना देवून त्यांच्या महान
कार्यास अभिवादन केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
हनमंत वडगावे, कृषि विकास अधिकारी सुभाष चोले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल
खमितकर, पंचायत विभागाचे सहाय्यक गट विकास अधिकारी व्हि.के. मुंढे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनिषा
चामे, समाज कल्याण विभागाचे कार्यालयीन अधिक्षक राम वंगाटे व इतर विभागाचे
कर्मचारी उपस्थित होते.
0000
Comments
Post a Comment