सामाजिक न्याय भवन येथे 14 एप्रिल रोजी

तृतीय पंथीयासाठी जनजागृती मेळावा

 

*लातूर दि. 13 (जिमाका):-* सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण लातूर येथे  गुरुवार दि. 14 एप्रिल 2022 रोजी  दुपारी 12.30 वाजता तृतीयपंथी जनजागृती मेळावा व transgender.dosje.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आलेल्या तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र वाटपाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  भारतीय राज्यघटनेव्दारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधुत्व  या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य घटनेने समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणाने व गांभीर्याने नमुद केलेली आहे. कलम 46 मध्ये  राज्य हे दुर्बलतर जनवर्ग  आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करेल. असे नमुद करण्यात आले आहे. वरील निर्देशांचे अनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणुन विविध कल्याणकारी  योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत, या करीता राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्‍यात आलेला आहे.

तसेच transgender.dosje.gov.in  या संकेतस्थळावर ज्या तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींची नोंदणी झालेली नाही अशा व्यक्तींनी आपले आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो सह सहायक आयुक्त  शिवकांत चिकूर्ते समाज कल्याण लातूर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी या कार्यालयातील घुगे संदश (समाज कल्याण निरीक्षक) 9405446216 व पांढरे शिवाजी (कनिष्ठ लिपीक) 9823768188 यांच्याशी संपर्क साधावा.

                                            0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा