7 मे 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
7 मे 2022 रोजी
राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
*
लातूर,दि.28 (जिमाका):-* लातूर जिल्ह्यातील
सर्व न्यायालयामध्ये शनिवार दि. 07 मे,
2022 रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानूसार
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करुन अधिकाधिक पक्षकारांनी
सहभागी होवून न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपुर्व प्रकरणे तडजोडीने
निकाली काढावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
अध्यक्षा न्या. सुरेखा कोसमकर यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणे
व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. सदरचे
लोक अदालत आभासी पध्दतीव्दारे देखील आयोजित करण्यात आले आहे. आपआपसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी या राष्ट्रीय
लोक अदालतीचे आयोजन लातूर जिल्ह्यातील न्यायालयात करण्यात आलेले आहे.
या
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात,
भू-संपादन, 138 एन.आय. अॅक्ट, कौटुंबिक प्रकरणे, बॅंक वसुली प्रकरणे, कामगार, वीज व पाणी बिल प्रकरणे, महसूल प्रकरणे, ग्राहक
तक्रार प्रकरणे व इतर दिवाणी प्रकरणे शिवाय वादपुर्व प्रकरणांमध्ये बॅंक वसुली प्रकरणे, वीज व पाणी बिल प्रकरणे, दूरध्वनी / मोबाईल कंपण्याची
प्रकरणे पक्षकारांनी आपसी समझोत्याकरीता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती एस.डी. अवसेकर यांनी केले आहे.
ज्या
नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात
किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क
साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment