राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामुळे 10 बालकांच्या डोळयांच्या तिरळेपणावर यशस्वी मात
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामुळे
10 बालकांच्या डोळयांच्या तिरळेपणावर यशस्वी मात
*लातूर दि.1(जिमाका)* दि.31 मार्च
2022 रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील
0 ते 18 वर्षे वयोगटातील शाळा व अंगणवाडीतील तपासणीमध्ये वैद्यकिय पथकांमापर्फत डोळयांचे
तिरळेपणा असलेल्या बालकांचे शस्त्रक्रिया शिबीर स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकिय
महाविद्यालय, अंबाजोगाई येथे दि.10 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील
लातूर जिल्ह्यातील एकूण 27 मुलांना शिबीरास्थळी घेऊन जाण्यात आले. अधिष्ठाता डॉ. भास्कर
खैरे यांनी 27 मुलांची तपासणी करुन त्यापैकी 12 मुलांना तिरळेपणा असल्यामूळे त्यांना
शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे एकूण 12 बालकांना दाखल करण्यात
आले व एकूण 10 बालकांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असे अधिष्ठाता डॉ. भास्कर
खैरे यांनी सांगितले.
या शिबीरासाठी
स्वाराती वैद्यकिय महाविद्यालय अंबाजोगाई येथील अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, व डॉ. संकेत
निसाले, नेत्रशल्य चिकित्सक व अधिकारी व कर्मचारी यांनी या शिबीरासाठी मोलाचे योगदान
दिले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख, यांनी अधिष्ठाता यांची सदरील शस्त्रक्रियेसाठी
सहमती व वेळ दिल्यामूळे त्यांचे आभार मानले. या शिबीरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.लक्ष्मणराव
देशमुख, निवासी वैद्यकिय अधिकारी, डॉ.सतीश हरिदास, डॉ.रविंद्र भालेराव, डॉ.श्रीधर पाठक,
तसेच डॉ. माधव शिंदे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच, सदरील शिबीर यशस्वी
करण्यासाठी झोंडे अमोल ;जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षकद्ध, सोनकांबळे राजेंद्र ;कार्यक्रम
सहाय्यक, तसेच सर्जे कपील; सांख्यिकी अन्वेषक यांनी मोलाचे योगदान दिले व जिल्ह्यातील
कार्यरत आरबीएसके पथकातील वैद्यकिय अधिकारी, औषधनिर्माता व एएनएम यांनी मुलांच्या पालकांना
समुपदेशन करुन मुलांना शिबीरासाठी आणून शिबीर यशस्वी करण्यात आले.
0000
Comments
Post a Comment