भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम जिल्ह्यात सुरु

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सामाजिक समता कार्यक्रम जिल्ह्यात सुरु

लातूर,दि.14,(जिमाका):-अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत, या करीता राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दि. 06 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये साजरा करण्यात येत आहे.

या सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर या कार्यालयाअंतर्गत दि. 13 एप्रिल 2022 रोजी लातूर जिल्ह्यामधील तालूका रेणापूर येथे समतादुत प्रा. मनीषा बडे यांनी उपस्थितांना संविधान जागर या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन मोरे यांनी केले तर आभार रोहे यांनी केले . सदरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुष्पा शिंदे यांनी परीश्रम घेतले.

तसेच देवणी तालुक्यातील बोरोळ या गावी समतादुत राम बनसोडे यांनी उपस्थितांना संविधान जागर या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले तसेच सदरील कार्यकमासाठी गावाचे सरपंच प्रतिनिधी दत्ता बिराजदार व उपरसपंच ज्ञानेश्वर शेंडगे सामाजिक कार्यकर्ते व्यंकट सुर्यवंशी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सदाविजय पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन पदमाकर कांबळे यांनी केले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदाबहार पवार व बालाजी गिरी यांनी परिश्रम घेतले.

 

                                                0000

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु