जिल्ह्यात कोव्हीड-19 चे प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल; मात्र आरोग्य यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश

 

जिल्ह्यात कोव्हीड-19 चे प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल;

मात्र आरोग्य यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश

 

*लातूर दि.1(जिमाका)* जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन प्राप्त निर्देशानुसार पूढील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.

कोविड-19 च्या प्रादुर्भाव प्रतिबंधित करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत निर्गमित केलेले सर्व प्रतिबंधात्मक आदेश याव्दारे तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणण्यात येत आहेत.

सर्व नागरीक, आस्थापना आणि संस्थांना याव्दारे सूचित करण्यात येते की, फेसमास्क घालणे, शारिरिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता इत्यादींसह कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करणे यापुढे देखील सुरु ठेवावे, कारण हे वर्तन (CAB) नागरिकांच्या तसेच समाजाच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी सर्वात मोठे संरक्षण आहे.

जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा व सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना निर्दशित करण्यात येते की, कोव्हीड-19 प्रादुर्भावाच्या विविध आयामांविषयी दक्ष रहावे. यामध्ये दैनिक नवीन रुग्णांची संख्या, सक्रिय प्रकरणांची संख्या, सकारात्मकता दर तसेच वैद्यकीय संस्था आणि रुग्णांलयांमधील विविध खाटांची स्थिती, ई. वर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. या निर्देशांकातून भविष्यातील धोका ओळखून तसेच कोव्हीड-19 प्रादुर्भाव सूचित करणारा कोणताही ट्रेंड लक्षात आल्यास, तातडीने जिल्हा प्राधिकरणास अवगत करावे. जेणेकरुन अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी योग्य कारवाई करता येईल.

जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांना निर्देशित करण्यात येते की, कोव्हीड-19 लसीकरण करुन घेणेबाबत विविध माध्यमातून जनजागृती व प्रबोधन करण्यात यावे असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

                                                 0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु