शासकीय एक हजार मुलां-मुलींचे वसतिगृह एमआयडीसी येथे रक्तदान शिबीर संपन्न
शासकीय एक हजार मुलां-मुलींचे वसतिगृह
एमआयडीसी येथे रक्तदान शिबीर संपन्न
लातूर दि. 12 ( जिमाका ):- सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा,
शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याबाबतचे निर्देश होते.
त्याअनुषंगाने नुकतेच 1 हजार मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृह, एमआयडीसी, लातूर येथे सहाय्यक
आयुक्त समाज कल्याण लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या रक्तपेढीकरिता रक्तदान शिबीर संपन्न झाले असल्याचे सहाय्यक आयुक्त
समाज कल्याणचे सहायक लेखाधिकारी डी.के. राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधुता
त्रिसुत्रीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य घटनेने
समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणाने व गांभीर्याने
नमुद केलेली आहे. राज्य दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती
यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व
प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करेल, असे नमूद करण्यात आले आहे.
वरील निर्देशांचे
अनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय म्हणून
विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य
जनतेला व्हावी. तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत,
याकरिता राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम साजरा करण्यासाठी
वरील संदर्भिय शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
****
Comments
Post a Comment