पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उमंग येथील सेन्सरी गार्डनचे उद्घाटन

ऑटीझम - दिव्यांग विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रकला प्रदर्शनीची पाहणी करुन

पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे केले कौतुक

 

§  दिव्यांग विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रदर्शनातील काही चित्रांची केली खरेदी


लातूर दि.1 ( जिमाका ):- जिल्हा परिषद लातूर व सिध्दीविनायक प्रतिष्ठाण लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील दुस-या व महाराष्ट्रातील पहिल्या उमंग ऑटीझम उपचार केंद्रातील सेंन्सरी गार्डनचे उद्घाटन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपन्न झाले.  

या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख यांनी सेन्सरी गार्डनमधील दिव्यांगत्व कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्य व साधनांची पाहणी केली. सेन्सरी गार्डनमधील साहित्याद्वारे दिव्यांगत्व कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध थेरपी  कशा दिल्या जातात याची सविस्तर माहिती घेतली. तसेच ऑटीझम - दिव्यांग विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रकला प्रदर्शनीची पाहणी करुन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक केले. याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रदर्शनातील काही चित्रांची खरेदी केली.

           


या कार्यक्रमास लातूर महानगरपालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, विरोधी पक्ष नेते दिपक सुळ,  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,  पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, आयुक्त महानगरपालिका अमन मित्तल, अप्पर पोलीस अधिक्षक अनुराग जैन, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, डॉ. प्रशांत उटगे, किरण उटगे उपस्थिती होती.

कार्यक्रमास जिल्हयातील दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक, पालक, उमंग येथील सर्व कर्मचारी व समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

****








 


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा