कु. वैभवी यशवंत नामक मुलगी कोणास आढळल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा

 

कु. वैभवी यशवंत नामक मुलगी कोणास

आढळल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा

 

           *लातूर दि. 11 ( जिमाका)*  पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर येथे फिर्यादी नामे बाळु दत्तु यशवंत वय 45 वर्षे व्यावसाय ड्रायव्हर रा. देवळा ता. अंबेजोगाई जि. बीड ह.मु. रावन चिवडे यांचे वाडयात माताजी नगर लातूर मो. नं.7768087629 यांनी पो.स्टे. येवून लेखी अर्ज दिला की, दि. एप्रिल 2022 रोजी माझी मुलगी नामे वैभवी बाळु यशवंत वय- 15 वर्ष 03 महिने 19 दिवस ही कोणीतरी अज्ञात व्यक्तीने  अज्ञात कारणासाठी पळवून नेली आहे. आज रोजी पावेतो आम्ही मुलीचा आमचे नातेवाईक, शेजारी मित्र मैत्रीनी, शहर परीसर, मुळगावी इ. ठिकाणी शेध घेतला मात्र ती मिळून आली नसल्याने तक्रार दिली असल्याचे पोलीस उप- निरीक्षक पो.स्टे. विवेकानंद चौक लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                 सदरील मुलीचे वर्णन पूढील प्रमाणे आहे.- रंग सावळा, उंची अंदाजे 4 फुट 3 इंच, बांधा मध्यम केस -काळे लांब अंगावर टॉप गुलाबी रंगाचा, काळी जिन्स पँन्ट इ. वगैरे मजकुरावरुन पो.स्टे. विवेकानंद चौक लातूर येथे 200/ 2022 कलम 363 भादवि प्रमाणे दि. 6 एप्रिल 2022 रोजी वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे. वरिष्ठांचे आदेशानुसार सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वत:करीत आहोत.

                 या गुन्ह्यातील अपहृत मुलीचे वर्णन पूढील प्रमाणे आहे.नाव- वैभवी बाळु यशवंत वय -15 वर्ष 03 महिने 19 दिवस, रंग- सावळा, उंची- अंदाजे -4 फुट 3 इंच, बांधा-मध्यम केस-काळे लांब अंगावर टॉप गुलाबी रंगाचा, काळी जिन्स पँन्ट इ. कोणास या गुन्ह्यातील अपहृत मुलगी अज्ञात आरोपी आपल्या अधिपत्याखालील स्थानकांमध्ये  कोणाच्या निदर्शनास आल्यास आपण पूढील पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.

                 पो. स्टे. विवेकानंद चौक, लातूर :- 02382-258100, पोलीस निरीक्षक पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर :- 7350652345 व तपास अधिकारी एम.ए. गळकटे पोउपनि पो.स्टे. विवेकानंद चौक, लातूर :- 9503785090 असे ही पत्रकात नमुद केले आहे.

 

000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा