जिल्ह्यात 14 एप्रिल रेाजी सर्व मद्यविक्री बंद
जिल्ह्यात 14 एप्रिल रेाजी सर्व मद्यविक्री बंद
लातूर दि. 12 ( जिमाका ):- जिल्ह्यात 14 एप्रिल, 2022 रोजी डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार असून या जयंतीनिमित्त मिरवणुका,
मोटार सायकल रॅली व इतर सामाजिक कार्यक्रम खुल्या, मुक्त तसचे निर्भय वातावरणात, शांततेत
पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी. पी. यांनी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार तसेच नमुद कायद्यातंर्गत
केलेल्या विविध नियमानुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक 14 एप्रिल,
2022 रोजी संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या सर्व अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश
जारी केले आहेत.
या आदेशाची लातूर
जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक सदर आदेशाची
अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील. त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 व अनुषंगिक
नियमांधारे कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
****
Comments
Post a Comment