नागझरीत पोहचली विकसित भारत संकल्प यात्रा · पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदृश्य प्रणाली द्वारे नागझरीकरांनी ऐकले संबोधन · प्रतिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना लाभाचे वाटप · आरोग्य शिबिराचेही आयोजन
नागझरीत पोहचली विकसित भारत संकल्प यात्रा · पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदृश्य प्रणाली द्वारे नागझरीकरांनी ऐकले संबोधन · प्रतिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना लाभाचे वाटप · आरोग्य शिबिराचेही आयोजन लातूर , दि. 30 ( जिमाका) : ' विकसित भारत संकल्प यात्रा ' आज लातूर तालुक्यातील नागझरी येथे पोहचली , यावेळी येथे आरोग्य विभागाकडून रक्तदाब , मधुमेह याची प्राथमिक तपासणी आणि आयुष्यमान कार्ड संदर्भातील माहिती देण्यात आली. ' आपला संकल्प , विकसित भारत ' या एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील गावागावात फिरणाऱ्या यात्रेला संबोधन केलं. नागझरीतही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर , उपजिल्हाधिकारी संगीता टकले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहन अभंगे, गटविकास ...