लातूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वितरणास प्रारंभ · लातूर उपविभागीय कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात वितरण
लातूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वितरणास प्रारंभ
· लातूर उपविभागीय कार्यालयात प्रातिनिधिक स्वरुपात वितरण
लातूर, दि. 3 (जिमाका) : शासकीय अभिलेखांच्या तपासणीमध्ये कुणबी नोंदी आढळलेल्या कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही जलद गतीने करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी दिले आहेत. त्यानुसार लातूर उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात भिसे वाघोली येथील ग्रामस्थांना कुणबी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यसह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
*****
Comments
Post a Comment