‘फिट इंडिया मुव्हमेंट’ अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीसाठी 10 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

‘फिट इंडिया मुव्हमेंट’ अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीसाठी

10 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

लातूर, दि. 2 (जिमाका) : केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्यावतीने 2019 पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय खेळांचा इतिहास स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ भारतीय खेळाडू यांच्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे हा या चाचणीचा प्रमुख उद्देश आहे. यामध्ये 3.25 कोटी रुपयांची बक्षिसे विद्यार्थी व शाळांना वाटप करण्यात येतात. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणी ‘फिट इंडिया क्विझ-3’ चे आयोजन करण्यात आले असून यासाठी 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत https:/fitinida.nta.ac.in या कार्यालयीन संकेतस्थळावर शाळा व विद्यार्थी यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणी  ‘फिट इंडिया क्विझ-3’ अंतर्गत विद्यार्थी व शाळांसाठी प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण ते राष्ट्रीयस्तरावरील प्राथमिक बक्षीस स्वरुपात 2 हजार ते 25 लाख रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थी यांनी 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत https:/fitindia.nta.ac.in/ संकेतस्थळावर नोंदणी करून या चाचणीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा