ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानामुळे 13 ग्रामपंचायत क्षेत्रातील मद्यविक्री दोन दिवस राहणार बंद

                               ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानामुळे

13 ग्रामपंचायत क्षेत्रातील मद्यविक्री दोन दिवस राहणार बंद

लातूरदि.2 (जिमाका) : जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका व 47 ग्रामपंचायतीमधील 53  रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक होणार असल्याने 7 तालुक्यातील 13 ग्रामपंचायत क्षेत्रातील मद्यविक्री दोन दिवस बंद राहणार आहे. तसेच मतमोजणीच्या ठिकाणच्या परिसरातील मद्यविक्री मतमोजणी दिवशी बंद राहील. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मुंबई दारुबंदी कायदा1949 चे कलम 14 (1) अन्वये याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

लातूर तालुक्यातील भातांगळीभोईसमुद्रगाहरंगुळ बु. शाम नगरऔसा तालुक्यातील शिंदाळा लो. किल्लारीनिलंगा तालुक्यातील शेळगीतळीखेडशिरुर अनंतपाळ तालुक्यातील शिवपुरउदगीर तालुक्यातील लोहाराहंडरगुळीजळकोट तालुक्यातील कुनकी व अहमदपूर तालुक्यातील धानोरा बु. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मद्यविक्री मतदानाच्या पूर्वीचा एक दिवस म्हणजेच 4 नोव्हेंबर 2023 व मतदानाचा दिवस म्हणजेच 5 नोव्हेंबर 2023 रोजी संपूर्ण दिवस बंद राहील. तसेच मतमोजणी दिवशी म्हणजेच 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी ठिकाणाच्या परिसरातील मद्यविक्री मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद राहील.

या आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत नमूद तरतुदीनुसार संबंधित अनुज्ञप्तीधारकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु