सहायक मतदार यादी निरीक्षक यांची लातूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना भेट

                                                  सहायक मतदार यादी निरीक्षक यांची

लातूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना भेट

लातूर, दि. 22  (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-2024 च्या लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरु असलेल्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सहायक मतदार यादी निरीक्षक तथा छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातील चौकशी सहायक आयुक्त राम लाहोटी यांनी लातूर जिल्ह्याचा दौरा केला केला. यावेळी त्यांनी औसा आणि लातूर तहसिल कार्यालय येथे भेट देवून कामकाजाची पहाणी केली.

लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा क्षेत्रातील बुधोडा या गावातील मतदान केंद्रास श्री. लाहोटी यांनी भेट देवून पहाणी केली. तसेच या मतदान केंद्रावरील मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांच्‍या कामकाजाची माहिती घेतली. त्यांनी लातूर जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे भेट देवून सर्व राजकीय पक्ष यांचे अध्‍यक्षांची बैठक घेऊन मतदार यादीच्‍या कामकाजासंबंधी चर्चा केली.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा