*परदेशी शिक्षणासाठी शासनाने दिले 'सारथी'च्या माध्यमातून पंख*
महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी, मराठा, मराठा-कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांना कुणबी-मराठा, आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्याची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचे ठरवून राज्य मंत्रीमंडळाने दि. ४ जुले, २०२३ रोजी निर्णय घेतला आणि 'सयाजीराव गायकवाड -सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना ' सुरु करण्यात आली आहे. ती योजना नेमकी कशी आहे, त्या संदर्भातील आढावा...!! महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी / पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी QS World Ranking मध्ये २०० च्या आत रॅन्कींग असलेल्या शैक्षणिक संस्था/ विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेतील अशा मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे ७५ विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. ही योजना छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या शासनाच्या संस्थेमार्फत "सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना" या नावाने शैक्षणिक वर्ष २०२३ २४ पासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. *योजनेची व्याप्ती* ही योजना महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या जातीतील विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येतील. लागू राहील. पात्र विद्यार्थ्याचे अर्ज सारथी संस्थेकडून ऑनलाईन स्वरुपात मागवून घेण्यात येतील. *शिष्यवृत्ती शाखानिहाय विभागणी* :- या शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे शाखा निहाय मर्यादा प्रत्येक वर्षासाठी निश्चित करण्यात आली आहे. अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी पदव्युतर पदवी / पदविका (एमएस / एमटेक 20 तर डॉक्टरेट (पीएचडी) साठी 05 जागा, वास्तुकलाशास्त्र या अभ्यासक्रमासाठी पदव्युतर पदवी / पदविका (एमएस / एमटेक 04 तर डॉक्टरेट (पीएचडी) साठी 02 जागा, व्यवस्थापन या अभ्यासक्रमासाठी पदव्युतर पदवी / पदविका (एमएस / एमटेक 02 तर डॉक्टरेट (पीएचडी) साठी 01 जागा, विज्ञान या अभ्यासक्रमासाठी पदव्युतर पदवी / पदविका (एमएस / एमटेक 10 तर डॉक्टरेट (पीएचडी) साठी 05 जागा, वाणिज्य/अर्थशास्त्र या अभ्यासक्रमासाठी पदव्युतर पदवी / पदविका (एमएस / एमटेक 04 तर डॉक्टरेट (पीएचडी) साठी 05 जागा, कला या अभ्यासक्रमासाठी पदव्युतर पदवी / पदविका (एमएस / एमटेक 04 तर डॉक्टरेट (पीएचडी) साठी 01 जागा, विधी अभ्यासक्रम या अभ्यासक्रमासाठी पदव्युतर पदवी / पदविका (एमएस / एमटेक 04 तर डॉक्टरेट (पीएचडी) साठी 01 जागा, औषध निर्माण शास्त्र या अभ्यासक्रमासाठी पदव्युतर पदवी / पदविका (एमएस / एमटेक 02 तर डॉक्टरेट (पीएचडी) साठी 01 जागा, या सर्व अभ्यासक्रमासाठी पदव्युतर पदवी / पदविका एकूण (एमएस / एमटेक) 50 तर डॉक्टरेट (पीएचडी) या अभ्यासक्रमासाठी एकूण 25 जागा आहेत. जर एखादा विषय / अभ्यासक्रम करिता आवश्यक त्या प्रमाणात विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर त्याच विषयामधील पदव्युत्तर पदवी / पदविका ते पीएचडी या दोन्ही मध्ये आंतरबदल करण्याचे अधिकार निवड समितीला असेल.02 वरील 01 प्रमाणे आंतरबदल करूनही जर एखाद्या विषयाकरिता विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत, तर दुसऱ्या विषयाकरिता मंजूर संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी उपलब्ध होत असतील, तर त्याप्रमाणे बदल करण्याचे सर्वाधिकार निवड समितीला असतील. ज्या अभ्यासक्रमासाठी जास्त संख्येने विद्यार्थी उपलब्ध होतील त्या विषयासाठी प्राधान्य देण्यात येईल. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे सर्वाधिकार निवड समितील राहतील. महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षेला पंख देणारी योजना सुरु केली आहे. ज्यांना परदेशी शिकण्याची इच्छा आहे आणि आर्थिक परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना हा मोठा आधार आहे. यासाठी अधिकाधिक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या योजनेसाठी अर्ज करावा आणि उच्च शिक्षणात भरारी घ्यावी हाच शासनाचा उद्देश आहे. - युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी, लातूर ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु