एआरटी : ‘एचआयव्ही’ बाधितांवरील उपचाराची प्रभावी पद्धत
विशेष लेख : जागतिक एड्स दिन
विशेष
एआरटी : ‘एचआयव्ही’ बाधितांवरील
उपचाराची प्रभावी पद्धत
एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या रक्तातील
विषाणूचे प्रमाण वाढल्यानंतर बाधित व्यक्ती आजारी पडू लागतात. त्यावर ‘अॅन्टी
रिट्रोव्हायरल ट्रिटमेंट’ अर्थात एआरटी उपचार पद्धतीने उपचार केला जातो. यामूळे
एचआयव्हीबाधित व्यक्तीच्या रक्तातील कोशिका (पांढऱ्या पेशी) वाढवून विषाणूची
संख्या कमी करुन आरोग्यात सुधारणा होते. त्यामुळे एचआयव्ही बाधित व्यक्ती सामान्य
माणसासारखे जगू शकतो.
एआरटीमूळे विषाणूचे प्रमाण कमी झाले,
तरी ही उपचार पध्दती जीवन भर घेणे आवश्यक आहे. उपचार बंद केले तर विषाणूवरील
नियंत्रण कमी होऊन विषाणूचे प्रमाण वाढते. रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते
आणि एचआयव्ही बाधित रुग्णांना क्षयरोग व इतर आजार होऊ शकतात. त्यामुळे ही उपचार
पध्दती आयुष्यभराची आहे. सरकारी रुग्णालयात ही उपचार पध्दती एआरटी केंद्रामध्ये
मोफत उपलब्ध आहे.
नॅकोच्या नवीन मार्गदर्शक सूचना मे, 2017 नुसार
जे रुग्ण एचआयव्ही बाधित असतील, अशा सर्व रुग्णांना एआरटीची औषधी दिली जातात.
यामध्ये सीडी 4 म्हणजेच पांढऱ्या पेशी कितीही असल्या तरीही व कोणत्याही वयोगटातील
(गरोदर स्त्रीया, लहान मुले व सामान्य रुग्ण) एचआयव्ही बाधित रुग्णांना
एआरटीची औषधी सुरु केली जातात. जर एचआयव्ही संसर्गीत रुग्णांना वेळीच औषधी दिली
गेली, तर एचआयव्हीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊन रुग्णांचे आयुषमान
वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे एचआयव्ही संसर्गीत रुग्णांना होणाऱ्या क्षयरोग व
इतर आजारापासून संरक्षण होते.
एचआयव्ही संसर्गीत रुग्णांना एआरटीचे
उपचार चालू असतील, तर त्याच्यापासून त्याच्या जोडीदारस, गरोदर मातेपासून होणाऱ्या बाळास
संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होते. एआरटी औषधीमुळे रुग्णांचे जीवनमान उंचावण्यास
मदत होते. लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एआरटी उपचार केंद्र सन 2007
पासून कार्यरत असून याठिकाणी एचआयव्ही संसर्गीत रुग्णांना, सर्व तपासण्या व औषधोपचार पूर्णपणे
मोफत पुरविले जातात. त्याचप्रमाणे अशा एचआयव्ही संसर्गीत रुग्णांना योग्य समुपदेशन
केले जाते.
-
डॉ. सुनिता डोंबे, एआरटी उपचार केंद्र,
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर
******
Comments
Post a Comment