लातूर शहर महानगरपालिकेच्या धूळशमन वाहनाचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते लोकार्पण

 

लातूर शहर महानगरपालिकेच्या धूळशमन वाहनाचे

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते लोकार्पण


लातूर
, दि. 21  (जिमाका) : शहरातील वायू प्रदूषण, रस्त्यावरील धूळ, माती यावर नियंत्रण आणण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेने धूळशमन (डस्ट सप्रेशन) वाहन खरेदी केले आहे. या वाहनाचे आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी वाहनाबाबत माहिती जाणून घेतली.

महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त आयुक्त शिवाजी गवळी, उपायुक्त मयुरा शिंदेकर, जिल्हा सह-आयुक्त रामदास कोकरे, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम विभागातील पंडित लोहारे, पर्यावरण सल्लागार राहुल बोबे यांचीही यावेळी उपस्थिती होती.     

केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम विभागाकडून लातूर शहर महानगरपालिकेला वायु प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी निधी उपलब्ध झाला. या निधीमधून लातूर शहर महानगरपालिकेने शहरातील वायु प्रदूषण व घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध उपयोजना राबवण्यात येत आहेत. शहरातील वायु प्रदूषण कमी, धूळ कमी करण्यासाठी धूळशमन वाहन खरेदी करण्यात आले आहे. या वाहनातील मशीनद्वारे शहरातील वायु प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु