एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल शाळांमध्ये प्रवेशासाठी २५ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रवेश परीक्षा

 

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल शाळांमध्ये प्रवेशासाठी 

२५ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रवेश परीक्षा

लातूर, दि. 21  (जिमाका) :  अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुल शाळांमध्ये प्रवेशासाठी २५ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. पात्र विद्यार्थ्यांकडून या परीक्षेचे अर्ज भरून मुख्याध्यापकांनी संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे १७ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत सादर करावेत, असे छत्रपती संभाजीनगर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी कळविले आहे.

परीक्षेचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. अमरावती आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त एकात्म‍िक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुसद आणि कळमनुरी यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या १२ जिल्ह्यांतील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व शासन मान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी ते आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसुचित, आदिम जमातीचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र राहतील, असे श्रीमती बोकडे यांनी कळविले आहे.

****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा