शासनाच्यावतीने तन्वी ॲग्रो एजन्सी बोरी येथील जप्त केलेली किटकनाशके, खते, तणनाशके व इतर कृषि साहित्याचे बोलीद्वारे जाहीर लिलाव
शासनाच्यावतीने तन्वी ॲग्रो एजन्सी बोरी येथील जप्त केलेली
किटकनाशके, खते, तणनाशके व इतर कृषि साहित्याचे बोलीद्वारे जाहीर लिलाव
लातूर, दि. 17 (जिमाका) : जिल्हाधिकारी लातूर यांच्या आदेशान्वये उपविभागीय कृषि अधिकारी, लातूर महाराष्ट्र शासनाच्यावतीने तन्वी ॲग्रो एजन्सी, बोरी ता. जि. लातुर यांच्या जप्त केलेल्या किटकनाशके , खते, तणनाशके, व इतर कृषि साहित्याचे जाहीर लिलाव बोलीद्वारे शासनाच्या (ऑनलाईन) ई-ऑक्शन या बेबसाईट वर दि. 22 नोव्हेंबर, 2023 पासून सुरु करीत आहे. या मालाची अंदाजे एकूण किंमत रु. 27 लाख 29 हजार 676 आहे. या ई-ऑक्शन मध्ये खते, किटकनाशके परवानाधारक दुकानदार, फर्म, एफ.पी.ओ., एफ.पी.सी, शेतकरी गट तसेच स्वत: शेतकरी भाग घेऊ शकतात.
या कार्यवाही संबंधित बुकलेट शासनाच्या संकेतस्थळावर https://eauction.gov.in उपलब्ध आहे.
तसेच ई-ऑक्शनमधील बोली स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार उपविभागीय कृषि अधिकारी लातूर यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली बोली स्विकारली जाणार नाही. खालील संकेतस्थळावर ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे. https://eauction.gov.in सदर ई-ऑक्शन सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील बेवसाइटवरती कळविण्यात येईल, असे उप विभागीय कृषि अधिकारी लातूर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****
Comments
Post a Comment