मतदार नोंदणीसाठी शनिवार, रविवारी विशेष शिबीर

 मतदार नोंदणीसाठी शनिवार, रविवारी विशेष शिबीर

लातूर, दि. 23  (जिमाका) : भारत निवडणूक आयोग व राज्याचे मुख्यी निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार शनिवार25 नोव्हेंबर 2023 आणि रविवार26 नोव्हेंबर 2023 रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमसाठी प्रत्ये क मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तिरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती करण्याकत आली असून ते  मतदान केंद्रावर हजर राहणार आहेत.

मतदार नोंदणी विशेष शिबिरामध्ये पात्र नागरीकांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. या शिबिरांमध्ये मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून नागरिकांची मतदार नोंदणीनाव दुरुस्ती वा नाव वगळणीचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारीउप जिल्हा निवडणूक अधिकारीमतदार नोंदणी अधिकारीसहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी काही विशेष शिबिरांना भेटी देऊन तेथील कामकाजाचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी कळविले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा