साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडे मांतग समाजाच्या जमीनधारकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडे
मांतग समाजाच्या जमीनधारकांनी संपर्क साधण्याचे आवाहन
लातूर, दि. 1 (जिमाका) : लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील मांग, मिनी मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या जातीतील ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, अशा व्यक्तींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयाच्या 02382-257050 या कार्यालयास संपर्क साधावा.
लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 जातीतील जमीनधारकांनी महामंडळात अर्जासोबत शेतीचा सातबारा, जातीचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी माहितीसह 20 नोव्हेंबर, 2023 पर्यंत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्जासह कागदपत्रे सादर करावीत, असे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment