अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत आवाहन
अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याबाबत आवाहन
लातूर दि. 20 (जिमाका) : शहरातील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन अंतर्गत औसा रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर पडलेल्या अनोळखी पुरुषाला (वय अंदाजे 65 वर्षे) रुग्णवाहिकेने शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. 17 नोव्हेंबर 2023 दुपारी 3 वाजता तो मयत झाला आहे. त्याची ओळख पटविण्यासाठी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लातूर येथील शासकीय दवाखान्यात शवगृहात पंचनामा भरून वैद्यकीय याद्या पाठवून देण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. अंदाजे 65 वर्षे वय, सडपातळ बांधा, निमगोरा रंग, डोकीस व दाढीस पांढरे केस, अंगात पांढऱ्या रंगाचे मळकट उभ्या लाईन असलेला पांढऱ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, मळकट पांढऱ्या रंगाची पँट, अंदाजे उंची 165 सें.मी. असे मयत व्यक्तीचे वर्णन असून त्याबाबतची माहिती असल्यास विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथील सहायक फौजदार व्ही. एस. फुलारी (भ्रमणध्वनी क्र. 9049800547) यांच्याशी किंवा 02382-258100 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment