लातूर जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी, अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्यास 7 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
लातूर जवाहर
नवोदय विद्यालयात इयत्ता नववी, अकरावी
प्रवेशासाठी अर्ज करण्यास 7 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
लातूर, दि. 3 (जिमाका) : केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयामार्फत संचालित लातूर येथील
जवाहर नवोदय विद्यालयात 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववी व अकरावी
प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्यास 7 नोव्हेंबर 2023
पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
लातूर जिल्ह्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता आठवीत शिकत असणारे विदयार्थीच इयत्ता
नववी प्रवेश चाचणी परीक्षेसाठी पात्र राहतील. प्रवेश परीक्षा देणाऱ्या
विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2009 पूर्वी आणि 31 जुलै 2011 नंतर झालेला नसावा. तसेच
इयत्ता अकरावी प्रवेश चाचणी प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म 1 जून
2007 पूर्वी आणी 31 जुलै 2009 नंतर झालेला नसावा. ही अट सर्व राखीव गटासाठीही लागू
राहील. सत्र 2023-24 दरम्यान दहावीमध्ये शिकत असलेले उमेदवार इयत्ता अकरावी प्रवेश
चाचणी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता
नववी, अकरावी प्रवेश चाचणी परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी प्रवेश परीक्षा प्रभारी
बी. डी . शेख (भ्रमणध्वनी क्र. 9817834930) किंवा व्ही. एच. खिल्लारे
(भ्रमणध्वनी क्र. 986056८८40) यांच्यासही भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे शिक्षणाधिकारी, तसेच नवादेय विद्यालयाचे
प्राचार्य संजय पाटील यांनी केले आहे.
******
Comments
Post a Comment