राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान व असमान निधी योजनांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
राजा
राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या
समान व
असमान निधी योजनांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि.
3 (जिमाका) : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य
विभागांतर्गत कोलकता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या माध्यमातून
समान निधी व असमान निधी योजना राबविली जाते. या अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक
ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविल्या जातात.
या योजनांसाठी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत प्रस्ताव
सादर करण्याचे आवाहन राज्याच्या ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथालय संचालक दत्तात्रय
क्षीरसागर यांनी केले आहे.
2023-24 या आर्थिक वर्षात समान योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रंथालयाच्या इमारतीचे
बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेत 25 लाख रुपये दिले जाणार आहेत. या योजनेव्यतिरिक्त
समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने दिला जातो. या योजनांचा
लाभ घेण्यासाठी इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी राजा राममोहन रॉय
ग्रंथालय प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे
संकेतस्थळ पहावे. ग्रंथालयांनी वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा आवश्यक
कागदपत्रांसह प्रस्ताव विहित मुदतीत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी
कार्यालयास 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन श्री. क्षीरसागर यांनी
केले आहे.
*****
Comments
Post a Comment