शिरूर अनंतपाळक, चाकूर आणि औसा तालुक्यात सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर स्थापन होणार सघन कुक्कुट विकास गट
शिरूर अनंतपाळक, चाकूर आणि औसा तालुक्यात
सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर स्थापन होणार
सघन कुक्कुट विकास गट
लातूर, दि. 21 (जिमाका) : सन
2021-2022 अंतर्गत लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातून एका सर्वसाधारण महिला
लाभार्थी, चाकूर
तालुक्यातून एका अनुसूचित
जाती महिला लाभार्थी आणि औसा तालुक्यातून सर्वसाधारण
पुरुष लाभार्थीची शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या
सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे या योजनेकरिता
लाभार्थीची निवड करावयाची आहे.
या प्रकल्पाची
एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 असून यापैकी लाभार्थ्यांना शासनाचे 50 टक्के अनुदान
म्हणजेच रुपये 5 लाख 13 हजार 750 देय आहे. उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थी स्वत:चा हिस्सा
किंवा वित्तीय संस्थाकडून कर्ज घेवून उभा करु शकेल. तरी शिरुर अनंतपाळ,
चाकूर व औसा तालुक्यातील इच्छूक पात्र लाभार्थ्यांनी
विहीत नमुन्यातील अर्ज 5 डिसेंबर, 2023 पर्यंत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत
समिती शिरुर अनंतपाळ, चाकूर व औसा यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन
उपआयुक्त डॉ. एन.एस. कदम यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment