जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 29 नोव्हेंबरपासून आयोजन
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 29 नोव्हेंबरपासून आयोजन
लातूर, दि. 22 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा उपसंचालक, लातूर जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषि अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने 29 व 30 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हास्तर युवा महोत्सव 2023-24 चे आयोजन करण्यात आले आहे. लातूर येथील दयानंद सभागृहात हा महोत्सव होईल. युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देणे व त्यांना एक खुले व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षे घोषित केले असल्याने युवकांना तृणधान्याचे महत्व पटवून देवून विज्ञानाच्या आधारे तृणधान्य उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना यावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच तृणधान्य उत्पादन वाढ या संकल्पनेवार विविध प्रदर्शन, युवासाठी रोजगार व व्यवसाय संधी, यशोगाथा, पर्यावरण संरक्षण, भौगोलीक परिस्थीतीवर आधारीत वाढीसाठी उपाययोजना, समस्याचे निराकरण, संशोधणे, देश- विदेशात तृणधान्य आयात, निर्यात बाबत माहिती, विविध योजनांची माहिती, पाक कला इत्यादीबाबत युवकासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
युवकांमार्फत तयार करण्यात आलेले हस्तकला, वस्त्र उद्योग, अग्रो प्रोडक्ट इत्यादी वस्तूंचे प्रदर्शनही यावेळी आयोजित केले जाणार आहे. युवा महोत्सवात सांस्कृतिक कला प्रकारामध्ये समूह लोकनृत्य (सहभाग संख्या 10), वैयक्तिक सोलो लोकनृत्य (सहभाग संख्या 5), लोकगीत (सहभाग संख्या 10), वैयक्तिक सोलो लोकगीते (सहभाग संख्या 05) स्पर्धा होईल. कौशल्य विकास प्रकारात कथा लेखन (सहभाग संख्या 3), पोष्टर स्पर्धा (सहभाग संख्या 2), वकृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) (सहभाग संख्या-2), फोटो ग्राफी (सहभाग संख्या 02) या प्रकाराचा समावेश आहे. तसेच संकल्पना आधारित स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर (सहभाग संख्या 35), सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान (सहभाग संख्या 05) आणि युवाकृतीमध्ये हस्तकला (सहभाग संख्या 07), स्त्री उद्योग (सहभाग संख्या 07), अग्रो प्रोडक्ट (सहभाग संख्या 07) इत्यादी कलाकृतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
युवा महोत्सवामध्ये लातूर जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभाग घेवू शकतात. त्यांचे वय1 एप्रिल,2023 रोजीपर्यंत परिगनणना करण्यात येईल. युवा महोत्सवात सहभाग होण्यासाठी जिल्ह्यातील कृषि महाविद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, महिला मंडळ, महिला बचत गट, युवकांसाठी कार्य करणाऱ्या स्वंयसेवी संस्था, नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) इत्यादी संस्थेतील युवक व युवती यांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. युवा महोत्सवामध्ये प्रत्येक कलाप्रकारासाठी विजयी स्पर्धकांना रोख बक्षिस, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विजयी स्पर्धकांना विभागीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
लातूर जिल्ह्यातील उपरोक्त कला प्रकारामध्ये इच्छुक असणाऱ्या युवक व युवतींनी आपली नावे 26 नोव्हेंबर, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्षात व ई-मेल आयडी dsolatur@rediffmail.com वर नोंदवावीत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे (भ्रमणध्वनी क्र. 9975576600) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे व जिल्हा कृषि अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment