किक बॉक्सिंग व तायक्वाँदो स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी 28 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर, दि. 25 (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत लातूर जिल्हा
क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2023-24
मध्ये आयोजित किक बॉक्सिंग व तायक्वांदो स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्यातील शाळेतील
खेळाडूंना सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील शाळांनी या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक स्पर्धकांच्या ऑनलाईन
प्रवेशिका 28 नोव्हेंबर, 2023 पर्यंत भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे
यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment