साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडे मांतग समाजाच्या जमीनधारकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडे

मांतग समाजाच्या जमीनधारकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

लातूर, दि. 6 (जिमाका) : लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील मांग, मिनी मादीग, मादीग, दानखणी मांग, मां महाशी, मदारी, राधे मांग, मां गारुडी, मांग गारोडीमादगी, मादिगा या जातीतील ज्यांच्या नावे शेतजमीन आहेअशा व्यक्तींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयात 20 नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

 

लातूर जिल्ह्यात ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, अशा मातंग समाजातील व तत्सम पोटजातीतील व्यक्तींची माहिती विविध योजनांच्या अनुषंगाने शासनस्तरावरून मागविण्यात आली आहे. तरी अशा व्यक्तींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनलातूर येथील जिल्हा कार्यालयात येथे 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी आवाहन केले आहे.  

******

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा