अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटरमध्ये 26 नोव्हेंबर रोजी माजी सैनिक मेळावा
अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटरमध्ये
26 नोव्हेंबर रोजी माजी सैनिक मेळावा
लातूर, दि. 22 (जिमाका) : अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर आणि स्कूल येथे माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबियांच्या अडीआडचणी सोडविण्याकरिता व विविध कामात सहकार्य करण्यासाठी रविवार, 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेळावा आयोजित केला आहे.
लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबियानी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आहवान जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment