निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची

ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

लातूरदि.23 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून लातूर जिल्ह्यामध्ये विशेषत: द्राक्षडाळिंगआंबा या फळपिकांची व विविध भाजीपाला पिकांची व्यावसायिक दृष्टीकोनातून लागवड करून नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन करण्यात येते. अशा फळबागांची आणि भाजीपाला पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

सन 2023-24 मध्ये द्राक्ष व आंबा पिकांची शेत नोंदणी सुरु झाली असून इतर पिकांची नोंदणी वर्षभर सुरु असते. सन 2023-24 मध्ये ग्रेपनेट प्रणालीवर द्राक्ष पिकांची नोंदणी 19 ऑक्टोंबर,2023 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची ट्रेसबिलीटी नेटद्वारे नोंदणी करण्यासाठी ग्रेपनेट-230 हेक्टरअनारनेट-20 हेक्टरव्हेजनेट-20 हेक्टरसिट्रसनेट 10 हेक्टर, ऑदर फ्रुटनेस-हेक्टर लक्षांक सर्व तालुक्यांना वितरीत करण्यात आलेले आहे. तसेच मँगोनेट प्रणाली 1 डिसेंबर, 2023 पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतनोंदणी करावीअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे.

 

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा