दंडाधिकारी चौकशीसाठी लेखी जवाब, निवेदन नोंदविण्याचे आवाहन
दंडाधिकारी चौकशीसाठी लेखी जवाब, निवेदन नोंदविण्याचे आवाहन
लातूर, दि. 28 (जिमाका) : येथील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहात प्रवेशित संगमेश्वर गणेश मसगल्ले (वय 19) याचा लातूर शासकीय रुग्णालय येथे वैद्यकीय उपचार चालू असताना 30 जूलै,2023 रोजी मृत्यु झाल्याने या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. याविषयी कोणाला माहिती द्यावायची असल्यास किंवा जवाब द्यायचे असल्यास त्यांनी 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत आपले लेखी निवेदन अथवा जवाब समक्ष हजार राहून नोंदविण्याचे आवाहन लातूरच्या उपविभागीय दंडाधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment