रब्बी 2023 हंगामामध्ये महाबीजचे 10 वर्षाच्या आतील आणि 10 वर्षाच्या वरील हरभरा बियाणे वितरणासाठी उपलब्ध

रब्बी 2023 हंगामामध्ये महाबीजचे 10 वर्षाच्या आतील आणि  

10 वर्षाच्या वरील हरभरा बियाणे वितरणासाठी उपलब्ध

 

*लातूर दि. 10 (जिमाका):*  रब्बी - 2023 हंगामामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कडधान्य योजनेमध्ये 10 वर्षाआतील हरभरा फुले विक्रांत, फुले विक्रांत, ऐ.की.जी.1109 ( पी.डी.के.व्ही कांचन) बी.जी. एम-10216. (पुसा चिकपी), तसेच 10 वर्षावरील हरभरा विजय व दिग्विजय प्रमाणित बियाणे वितरण योजनेअंतर्गत अनुदानावर कृषी विभाग व महाबीजमार्फत उपलब्ध झालेले आहे.

महाबीज मार्फत सदरील 10 वर्षाच्या आतील वाणाचे 3294 क्विटंल व 10 वर्षांवरील वाणाचे 1108.40 बियाणे उपलब्ध झालेले आहे. सदरील 10 वर्षा आतील वाण फुले विक्रम, फुले विक्रांत, ऐ.की.जी.1109 (पी.डे.के.व्ही कांचन ) बी.जी.एम-10216. ( पुसा चिकपी ) 20 किलोची बॅग 1700 रु. प्रती बॅग मुळ किंमत असुन त्यावर 500 रु प्रती बॅग अनुदान आहे. अनुदान वजा करुन 20 किलोची 1200 रु. प्रती बॅग व 10 वर्षांवरील वाण विजय दिग्विजय 20 किलोची बॅग 1540 रु. प्रती बॅग मुळ किंमत असुन त्यावर 300 रु प्रती बॅग अनुदान आहे. अनुदान वजा करुन 20 किलोची 1240 रु. प्रती बॅग अनुदानीत दराने वरील वाणाचे बियाणे महाबीजचे विक्रेते व उपविक्रेत्याकडे उपलब्ध झालेले आहे.

या अनुदानीत दराचे 10 वर्षाच्या आतील हरभरा वाणाचे बियाणे खरेदी करणेसाठी ज्या शेतकऱ्यांने कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज केला असेल. त्यांनी कृषी सहाय्यक / तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून परमीट घेवून बियाणे खरेदी करावे. व इतर शेतकऱ्यांने महाबीज विक्रेते व उपविकेत्याकडे 7/12 व आधारकार्डाची झेरॉक्स प्रत देवून अनुदानीत दराने बियाणे खरेदी करावे. ऐका शेतक-याला त्याच्या 7/12 वर धारण केलेल्या क्षेत्रानुसार जास्तीत जास्त 5 एकरसाठी 5 बॅगापर्यंत बियाणे अनुदानीत दराने खरेदी करता येईल. प्रथम येणा-यास प्रथम प्राध्यान्य या धर्तीवर बियाणे वाटप होईल.

तरी ऑनलाईन केलेल्या शेतक-यानी कृषी सहाय्यक / तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून परमीट घेवून व इतर शेतकऱ्यांनी सातबारा व आधारकार्डाची झेरॉक्स प्रत देवून अनुदानीत दराने हरभरा फुले विक्रम. फुले विक्रांत, ऐ.की.जी. 1109 ( पी. डे.के.व्ही कांचन ), विजय व दिग्विजय या वाणाचे बियाणे खरेदी करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी लातूर व जिल्हा व्यवस्थापक महाबीज एन. जी. इनामदार यांनी केले आहे.                                                     

****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु