कुष्ठरुग्ण आणि सक्रीय क्षयरुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपासून विशेष मोहीम

 कुष्ठरुग्ण आणि सक्रीय क्षयरुग्ण शोधण्यासाठी

जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपासून विशेष मोहीम

लातूर दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यात प्रधानमंत्री प्रगती योजनेतंर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम 20 नोव्हेंबर, 2023 ते 6 डिसेंबर, 2023 या कालवधीत राबविण्यात येत आहे. ही मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली.

मोहीम कालावधीत आशा व पुरुष स्वयंसेवक यांनी प्रत्यक्ष घरोघर भेटी देवून महिला व पुरुष यांची संपूर्ण तपासणी करावी. संशयित कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या. या मोहिमेत जिल्हास्तरावरून पर्यवेक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा शल्यचिकीत्सकसहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग )जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय एलसीडी, एएफसी कार्यशाळा उत्साहात

जिल्हास्तरीय एलसीडी, एएफसी कार्यशाळा 9 नोव्हेंबर रोजी लातूर येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावेअतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बरुरेजिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ एन. डी. बोडके उपस्थित होते. बाहयसंपर्क अधिकारी डॉ. अशोक सारडासहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. विद्या गुरुडेजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एन. तांबारे व जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. सम्यक खैरे यांनी कार्यशाळे दरम्यान मार्गदर्शन केले.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा