*जिल्ह्यात महसूल, शिक्षण, भूमीअभिलेख विभागाकडून कुणबी नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरु*
*जिल्ह्यात महसूल, शिक्षण, भूमीअभिलेख विभागाकडून कुणबी नोंदी तपासण्याचे
काम युद्धपातळीवर सुरु*
लातूर दि.9 ( जिमाका ) लातूर जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या सूचनेनुसार महसूलचे सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार, शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी, तालुका भूमीअभिलेख अधिकारी यांनी युद्ध पातळीवर काम सुरु केलं आहे. जबाबदारीचे वाटप केल्यामुळे नोंदी शोधण्याच्या कामाला गती आली आल्याचे अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यात यंत्रणा कामाला लागली असून ज्या ज्या विभागाकडे 1968 पूर्वीच्या नस्ती आहेत, त्या तपासल्या जात आहेत.1948 पूर्वीच्या नोंदी मोडी अथवा उर्दू मध्ये असल्यामुळे लिप्यांतर तज्ञ सोबत घेऊन अत्यंत बारकाईने या नोंदी तपासल्या जात आहेत. त्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त केले आहेत. जिल्हा स्तरावरूनहीं काही अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी गेले आहेत. रोजच्या रोज या कामाचा आढावा जिल्हाधिकारी घेत असल्यामुळे या कामाला मोठी गती आली आहे.
जिल्ह्यातील ज्या शाळा जुन्या आहेत त्यांचे निर्गम उतारे बघितले जात असून त्यासाठी शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी तालुका शिक्षण अधिकारी यांना तज्ञ लोकांची टीम करून या नोंदी तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यांच्याहीं टीम त्या त्या शाळेत जाऊन या नोंदी तपासत असल्याचेही अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांनी सांगितले.
*भिसे वाघोली येथे झाली विशेष ग्रामसभा*
लातूर तालुक्यातील भिसे वाघोली येथे 45 कुणबी नोंदी आढळून आल्या होत्या. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी या गावात 8 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून थेट गावात जाऊन कागदपत्र पडताळणी गेली काल 15 लोकांच्या ऑनलाईन नोंदी करून घेतल्या बाकी नोंदी तपासण्याचे काम 9 नोव्हेंबर रोजीहीं सुरु असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
****
Comments
Post a Comment