साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने गुरुवारी लातूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने
गुरुवारी लातूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
लातूर दि. 20 (जिमाका) : लातूर आणि बीड जिल्ह्यातील मांग व मातंग समाजातील तत्सम 12 पोट जातीतील बेरोजगार तरुण, तरुणी व व्यवसाय करण्यास उत्सूक असलेल्या मातंग समाजातील लाभार्थ्यांना महामडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी गुरुवार, 23 नोव्हेंबर, 2023 रोजी दुपारी 12 वाजता लातूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर येथील डॉ. बाबासाहेब आबडेकर सामाजिक न्याय भवन, जुने गुळ मार्केट येथील सभागृहात हा मेळावा होणार आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. जी. दरबस्तेवार यांनी दिली आहे.
रोजगार मेळाव्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे, महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक सुनिल वारे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेची माहिती देण्यात येणार आहे. तसेच मातंग समाजातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्तकर्ते समाजातील व्याख्यानकर्ते, सामाजिक कार्यकर्ते मान्यवर मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. तरी लातूर व बीड जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाच्या लातूर आणि बीडचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment