लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूरदि. 10 (जिमाका): जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थासार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये लातूर जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश 16 नोव्हेंबर, 2023 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 30 नोव्हेंबर 2023 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.

या आदेशान्वये शस्त्रेसोटेतलवारीभालेदंडेबंदुकासुरेकाठ्यालाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईलअशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीचे प्रेतेआकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणागाणे म्हणणेवाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभाअंत्ययात्राविवाहअधिकारीकर्मचारी यांना लागू राहणार नाहीअसे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु