विशेष मतदार नोंदणी शिबिरामध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात अडीच हजार अर्ज प्राप्त

 विशेष मतदार नोंदणी शिबिरामध्ये

नवीन मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात अडीच हजार अर्ज प्राप्त

लातूरदि. 9 (जिमाका) :  भारत निवडणूक आयोग व मुख्‍य निवडणूक अधिकारी यांच्या शिफारसीनुसार 1 जानेवारी 2024 या दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या अंतर्गत मतदार नोंदणीचेमतदार यादीतील नोंदींच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज स्वीकारण्यासाठी 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यात अडीच हजार नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना क्र. 6 अर्ज केले आहेत.

मयत अथवा दुबार अथवा कायम स्‍थलांतरीत असल्‍यामुळे मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी 183 जणांनी नमुना नं.  7 भरून दिला आहे. मतदार यादीतील तपशीलात दुरुस्‍तीपत्‍ता बदलमतदान ओळखपत्र हरविल्याने 496 व्यक्तींनी अर्ज नमुना नं. 8 भरून दिला आहे. तसेच 45 दिव्यांग बांधवांनी नवीन नोंदणीसाठी अर्ज केला आहे, तर 102 दिव्यांग बांधवांनी अर्ज नमून क्र. 8 भरून दिला आहे.

नवीन मतदार नोंदणीसाठी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 469, लातूर शहर विधानसभा मतदारसंघात 483, अहमदपूर मतदारसंघात 323, उदगीर मतदारसंघात 449, निलंगा मतदारसंघात 421 आणि औसा मतदारसंघात 407 अर्ज दाखल झाले आहेत. तसेच मतदार यादीतून नाव वगळणे आणि मतदार यादीतील तपशील दुरुस्तीसाठी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 132, लातूर शहर विधानसभा मतदारसंघात 215, अहमदपूर मतदारसंघात 45, उदगीर मतदारसंघात 129, निलंगा मतदारसंघात 127 आणि औसा मतदारसंघात 27 अर्ज दाखल झाले आहेत.

मतदार याद्यांचे संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारण्यासाठी शनिवार, 25 नोव्हेंबर आणि रविवार, 26 नोव्हेंबर रोजीही विशेष मतदार नोंदणी शिबीर सर्व मतदान केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी कळविले आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु