महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसे
महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट - क परीक्षा लातूर येथील नेटीझन्स डिजीटल, कॉस इंस्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन, गुरु ऑनलाईन एक्झाम सेंटर, स्वामी विवेकानंद इन्स्टीट्युट ऑफ पॉलिटेक्निक, ओम साई इन्फोटेक आणि निलंगा येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेशामुळे या सर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्र परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्ती यांना शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील.
परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडुन परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासही त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत, असे प्र. अपर जिल्हादंडाधिकारी नितीन वाघमारे यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment