जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम आणि
सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेला सुरुवात
लातूर, दि. 21 (जिमाका) : प्रधानमंत्री प्रगती योजनेतंर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम’ आणि ‘सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. लातूर शहरातील गौतम नगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. विद्या गुरुडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. श्रीमती एस. एन. तांबारे व महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आले.
आशा व पुरुष स्वयंसेवक यांनी प्रत्यक्ष घरोघर भेटी देवून महिला व पुरुष यांची संपूर्ण तपासणी करून संशयित कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्याबाबत, तसेच शोधलेले संशयीत यांची वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अवैद्यकीय पर्यवेक्षक एस.एस. फले, अवैद्यकीय सहाय्यक व महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment